सभागृहाची माहिती

आमच्या सुविधांची माहिती मिळवा

तुमच्या विशेष कार्यक्रमांना अभिजातता आणि सुसंस्कृतपणा जोडण्यासाठी डिझाइन केलेले, आमचे उत्कृष्ट लग्न आणि पार्टी सभागृह आपल्या सेवे साठी तयार आहे. लग्न असो वा वाढदिवस , वर्धापन दिन किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक कार्यक्रम करण्याचे आपले मनोदय असल्यास आमचे ठिकाण आकर्षक, सोयी आणि सुविधांचे अनोखे मिश्रण देते जे तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरेल. 

सभागृहे भाडे तक्ता

क्र. तपशील अनामत रक्कम वातानुकूलीत भाडे विना वातानुकूलीत भाडे सेवा कर
१.
पुर्ण दिवस सकाळी ९. ते रात्रौ १०.
रु.५०००/-
रु.१,५००/- प्रति तास
रु.१४,०००/-
भाडे + 18% GST
सकाळी ९ ते दुपार २ किंवा सायं ४ ते १० अर्धा दिवस
रु.९०००/-
रु.१,५००/- प्रति तास
रु.८,०००/-
भाडे + 18% GST
फक्त टेरेस, तळमजला
रु.१०००/-
—–
रु.५०००/-
भाडे + 18% GST

टीप :-

  • प्रत्येक अधिक तासा करिता रु.७०० + + 18% GST भाडे आकारण्यात येतील.
  • वातानुकूलीत कमीत कमी २ तासांकरिता घ्यावा लागेल.
  • प्रदर्शनासाठी भिंतीवर- जमिनीवर कोणत्याही प्रकारचे खिळे व हुक ठोकता येणार नाही.
  • डी.जे. किंवा इतर आवाज करणारे ध्वनीयंत्रणा वापरण्यास मनाई आहे.

सभागृहाचे

नियम व अटी

  • लग्नाकरिता एका दिवशी एकापेक्षा जास्त वधु-वर जोडी अथवा मुंजीकरीता जास्त बटू असल्यास अशा अधिकच्या समारंभाकरिता रू.2000.00 अधिक शुल्क आकारले जाईल.

  • एकूण भाडे शुल्कावर 18% GST आकारण्यात येईल.
  • आरक्षित तारीख रद्द केल्यास 40% रक्कम व पूर्ण अनामत रक्कम परत करण्यात येईल.

  • परतावा रक्कम समारंभ तारखेपासून किंवा सभागृह रद्द करण्याचे विनंती पत्र प्राप्त झालेल्या तारखेपासून एक महिन्यानंतर परत घेतली पाहिजे अन्यथा परत दिली जाणार नाही.
  • समारंभाच्या दिवशी अदानी इलेक्ट्रीसीटीचा विदयुत प्रवाह अनपेक्षितपणे खंडीत झाल्यास अथवा महानगरपालिकेकडून पाणी पुरवठा बंद झाल्यास त्यास संस्था जबाबदार असणार नाही.  पंरतु अशा परिस्थितीत आरक्षणाकर्त्यांच्या स्वखर्चाने जनरेटर-पाण्याचा टॅँकर मागविणे हया व्यवस्था उपलब्ध करून दिल्या जातील.
  • सभागृहात धुम्रपान X मद्यपान X, करण्यास ,गुटका खाण्यास तसेच इतर मादक पेय घेण्यास सक्त मनाई आहे.  सदरहू नियमांचे उल्लंघन केल्यास पूर्वसूचनेशिवाय स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येईल.
  • आरक्षण कर्त्यांनी आपल्या मौल्यवान वस्तुंची – सामानाची काळजी घ्यावी.  सामान चोरीला गेले अथवा गहाळ झाल्यास संस्था जबाबदार राहणार नाही.
  • सभागृहात कार्यक्रम सुरू असताना अपघात झाला किंवा एकाद्या व्यक्तीस दुखापत झाल्यास त्यास संस्था जबाबदार राहणार नाही.
  • सभागृहातील वस्तुंचा नुकसानीबाबत व सभागृह सोडण्याच्या वेळेबाबत संस्थेच्या कर्मचा-यांचा अहवाल हाच सर्वस्वी ग्राहय मानला जाईल.
  • कार्यक्रमाची छापील निमंत्रण पत्रिका समारंभाच्या पाच दिवस अगोदर कार्यालयात सादर करावी.
  • काही अनुचित व अपरिहार्य परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण रद्द करण्याचे पूर्ण अधिकार संस्थेकडे राहतील.
  • आरक्षित तारखेमध्ये फेरफार करता येणार नाही.

  • आवश्यकतेनुसार पूर्वसुचनेशिवाय भाडेपत्रकामध्ये फेरबद्दल करण्याचे सर्व अधिकार संस्थेकडे राखून ठेवण्यात आले आहेत.
  • विजेच्या व इतर वस्तूच्या साधनांच्या अधिक वापरा करिता सजावटदाराकडून जास्त रक्कम आकारण्यात येईल जर सजावटदार रक्कम न देताच गेला तर अर्जदाराच्या आरक्षणाच्या रक्कमेतून सदरहू रक्कम वळती करण्यात येईल.
  • जर कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त व्यक्ती असतील तर कॅटरर्स दाराकडून जास्त रक्कम आकारण्यात येईल.  जर कॅटरर्स रक्कम न देताच गेला तर अर्जदार आरक्षण रकमे मधून रक्कम वळती करण्यात येईल.
  • सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत याची नोंद घ्यावी.
  • वरील नियम व अटींचा भंग झाल्यास दंड आकारण्यात येईल.