अंकीय माहिती केंद्र (Digital Knowledge Centre)
वैशिष्टये
- ई-पुस्तके – विद्यार्थ्यांसाठी विविध विषयावरील अंकीय साहित्य
- व्हिडियो – रोजगार संबंधी तज्ञांचे मार्गदर्शन
- सराव परीक्षा – राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धासाठी परिक्षांची तयारी UPSC, MPSC, NEFT
- शोध मासिके – विविध विषयावरील ई – जनरल्स
- बालभारती पुस्तके – शालेय विद्यार्थ्यांसाठी
- अतिरिक्त संसाधने – बाहय स्त्रोतातील जोडण्या (मल्टिपल लिंक्स
- संस्थेने अंकीकरण केलेली महत्वाची दुर्मिळ पुस्तके, प्रमुख संज्ञा शोध प्रणालीसह
- वृत्तपत्रे
- नियतकालिके
श्री बाबाजी (मधुकर) धोंडू शेलार नॅशनल लायब्ररी वांद्रे अंकिय माहिती केंद्र
- अंकिय माहिती विविध उपकरणाद्वारे मिळते जसे की ई-पुस्तके संगणकाच्या माध्यमातून उपलब्ध होणे.
- हयामध्ये ई-पुस्तकासोबत व्हिडियो, ऑडियो तसेच बहुमाध्यमात उपलब्ध असलेले साहित्य प्राप्त करण्याची सोय देखील आहे.
- खास विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा हयांच्या तयारी साठी सराव परिक्षांची सोय आहे. त्यामुळे विद्यार्थांना यश मिळण्याची शक्यता वृध्दिंगत होईल.
- हया केंद्रा मध्ये बहुभाषीय अंकीय साहित्य बघणे आणि वाचणे उपलब्ध असल्यामुळे हयाचा फायदा सभासद घेऊ शकतील.
- हया अंकीय ज्ञान केंद्रातील सभासदांना इतर अंकिय स्त्रोतातील असलेले ज्ञानाची जोडणी उदा. राष्ट्रीय अंकिय ग्रंथालये, स्वयंम, विद्वान इत्यादि उपलब्ध आहेत.
- सभासदांना नवीन स्त्रोत तसेच ग्रंथालयात असलेल्या ई.साहित्याची माहिती तात्काळ पुरवली जाईल.
- भविष्यातील रोजगारासाठी सज्ज होण्यासाठी मार्गदर्शक व्हिडियोची खास उपलब्धता.
- उपलब्ध अंकिय माहिती साठयामध्ये वृत्तपत्रे, मासिके, शोध मासिके, बालभारती पुस्तके, नामांकित आंतरराष्ट्रीय प्रकाशकांची विविध विषयातील ई-पुस्तके तसेच स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा समावेश असेल.
- हया डिजिटल कॉर्नरमध्ये सुमारे 5000 दुर्मिळ पुस्तके त्यातील प्रमुख संज्ञा शोध प्रणाली सह उपलब्ध असतील.

