ग्रंथालय मार्गदर्शक

  • सभासदत्वासाठी अर्ज भरल्यानंतर आपले सभासदत्व मंजूर केल्यासंबंधीचे पत्र आपणास पोस्टाने पाठविण्यात येईल. सदर पत्र संस्थेमध्ये येतांना सोबत आणावे व त्याच वेळी सभासदत्वाचे शुल्क स्विकारण्यात येईल.
  • तिमाही वर्गणी आगाऊ म्हणजे तिमाहीच्या सुरूवातीलाच 15 तारखेच्या आत भरली पाहिजे.  एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर, ऑक्टोंबर ते डिसेंबर व जानेवारी ते मार्च असा तिमाहीचा कालावधी राहील.  तसेच मासिक विभागाची फी दर महा 10 तारखेपूर्वी भरावी.
  • सभासद आपल्या स्वत:च्या जबाबदारीवर कोणालाही आपल्या वतीने पुस्तक व मासिकांच्या देवघेवीचे अधिकार पत्र देऊ शकेल.  मात्र सर्व बाबतीत सभासदांस जबाबदार धरण्यात येईल.
  • पुस्तक दिलेल्या तारखेपासून 14 दिवसात व नवीन मासिक विभागातील मासिक चार दिवसात परत केले पाहिजे.  पुस्तके व मासिके वेळेवर परत न केल्यास प्रत्येक दिवसाला 5 रू. प्रमाणे दंड आकारण्यात येईल.  तसेच पुस्तकांच्या अग्रहक्क (क्लेम) कार्डासाठी रू 5/- प्रमाणे जादा आकार घेतला जाईल.
  • पत्त्यात कोणत्याही तारखेला बदल झाला असल्यास त्याप्रमाणे ताबडतोब लेखी कळविणे अगत्याचे आहे.
  • सभासदाने महिन्याच्या कोणत्याही तारखेला सदस्यत्व रद्द केले तरी त्या पूर्ण महिन्याची वर्गणी आकारण्यात येईल. सभासदाने नियमित पुस्तके मासिके घेतलेली असोत किंवा नसोत त्याने छापील अर्ज भरून ज्या महिन्यात सदस्यत्व रद्द केले असेल त्या महिन्यापर्यंतची वर्गणी द्यावी लागेल.
  • सभासदाने संस्थेचा छापील अर्ज भरून सदस्यत्व रद्द करावे.  असा छापील अर्ज भरून दिल्या नंतर सभासदांकडून वर्गणी किंवा पुस्तके येणे नसल्यास अनामत परत केली जाईल.
  • सभासदत्व वर्गणी – आजीव सभासदत्व रू.5501/- आश्रयदाता रू.3001/-.

सभासदत्व वर्गणी

सभासद वर्ग प्रवेश अनामत शुल्क तिमाही
आजीव ब वर्ग
——
रू.५००/-
रू.७०/-
——
साधारण
रू.२५/-
रू.५००/-
रू.७०/-
रू.२१०/-
साधारण ‘अ’
रू.२५/-
रू.१०००/-
रू.१४०/-
रू.४२०/-
मासिक विभाग
रू.२५/-
रू.१००/-
रू.७०/-
दरमहा

सभासदांसाठी सूचना

  • संस्थेच्या सभासदांकडून पुस्तके हरवतात अथवा गहाळ होतात. अशा वेळी सभासदांडून शक्यतो सदर पुस्तकांचीच दुसरी प्रत घेण्यात यावी असे संस्थेने ठरविले आहे. जर सभासदांना सदर पुस्तकांची दुसरी प्रत मिळाली नाही,तरी त्यांच्याकडून खालीलप्रमाणे भरपाई घेण्यात यावी,असे कार्यकारी मंडळाने ठरविले आहे.याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी,व या कामात सहकार्य करावे ही विनंती.
  • सभासदांकडून गहाळ झालेले पुस्तक १९५० पर्यंतच्या कालावधीतील असल्यास पुस्तकांची किमंतीच्या १०० पट किंमत वसूल करण्यात येईल.
  • पुस्तक १९५१-१९७० या कालावधीत प्रकाशित झाले असल्यास पुस्तकाच्या किंमतीच्या ५० पट किंमत वसूल करण्यात येईल.
  • पुस्तक १९७१-१९८० कालावधीत प्रकाशित झाले असल्यास ,पुस्तकाच्या किंमतीच्या १० पट किंमत वसून करण्यात यावी.
  • पुस्तक १९८१ ते चालू तारखेपर्यंत प्रसिध्द झालेले असल्यास ,पुस्तकाच्या किंमतीच्या दुप्पट किंमत वसूल करण्यात यावी.