फिरते ग्रंथालय

आमच्या सुविधांची माहिती मिळवा

फिरते ग्रंथालय

वाचनाचा आनंद थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी  ग्रंथालयाने डिझाइन केली मोबाईल लायब्ररी सेवा. आमच्या नाविन्यपूर्ण “लायब्ररी ऑन व्हील्स” म्हणजेच फिरते ग्रंथालय, उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमामुळे ग्रंथालयाचा विस्तार मुंबई भर झाला आहे. आमची ही बुक व्हॅन पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचा खजिना आहे, विविध परिसरांमध्ये प्रवास करुन वाचन सेवा प्रत्येकासाठी पुर्वत आहे.

फिरते ग्रंथालयाची फी पुढील प्रमाणे.

सभासद वर्ग अनामत महिना शुल्क तिमाहि शुल्क
साधारण
रु.५००/-
रु.१००/-
रु.३००/-
मासिक
रु.१००/-
रु.५०/-
रु.१५०/-
किशोर
रु.२००/-
रु.५०/-
रु.१५०/-

फिरते ग्रंथालय नियम व अटी

  • फिरते ग्रंथालयात प्रवेश घेताना एक फोटो व आधार कार्ड / पॅन कार्डची छायांकित प्रत.
  • पुस्तक दिलेल्या तारखेपासून 14 दिवसात व नविन मासिक 7 दिवसात परत केले पाहिजे.  पुस्तके व मासिके वेळेवर परत न केल्यास प्रत्येक दिवसाला रू.5/- प्रमाणे दंड आकारण्यात येईल.  तसेच पुस्तकांच्या अग्रहक्क (क्लेम) कार्डसाठी रू.5/- प्रमाणे जादा आकार घेतला जाईल.
  • घरच्या पत्त्यात कोणत्याही प्रकारे बदल झाला असल्यास त्याप्रमाणे ताबडतोब लेखी कळविणे बंधनकारक राहिल.
  • सभासदाने महिन्याच्या कोणत्याही तारखेला सदस्यत्व रद्द केले तरी त्या पूर्ण महिन्याची वर्गणी आकारण्यात येईल.  सभासदाने नियमित पुस्तके मासिके घेतलेली असोत किंवा नसोत त्याने छापील अर्ज भरून ज्या महिन्यात सदस्यत्व रद्द केले असेल त्या महिन्या पर्यंतची वर्गणी द्यावी लागेल.
  • सभासदाने संस्थेचा छापील अर्ज भरून सदस्यत्व रद्द करावे.  असा छापील अर्ज भरून दिल्यानंतर सभासदांकडून वर्गणी किंवा पुस्तक येणे नसल्यास अनामत परत केले जाईल.
  • ज्येष्ठ नागरिकांना 20%सवलत