देणगी
तुमची उदारता आपल्या समाजात लक्षणीय बदल घडवू शकते. आमच्या सार्वजनिक वाचनालयाला देणगी देऊन, तुम्ही शिक्षण, संस्कृती आणि आपल्या समाजाच्या भविष्यासाठी गुंतवणूक करत आहात. नॅशनल लायब्ररी, वांद्रे असे अनेक उपक्रम राबवते असते, जी सर्व वयोगटातील लोकांना पुस्तके, डिजिटल साहित्य एक मुख्य स्त्रोत आहे. ह्या बरोबर शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम समाजासाठी विनामूल्य केले जातात.
आपल्या देणगीतून आम्हाला पुस्तकांचा आणि डिजिटल साहित्य संग्रह राखण्यात आणि वाढवण्यासाठी मदत होते. हे पुस्तक रुपी ज्ञान व माहिती ज्यांना आवश्यक आहे त्या सर्वांना मिळण्याची खात्री करू. तुमच्या पाठिंब्याने, आपल्या समाजातील सदस्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या अधिक कार्यशाळा, साक्षरता कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम देऊ शकतो.
देणगीरुपी निधीचा वापर :
- संग्रह वाढवणे आणि अध्यावत करणे: ग्रंथालयाची पुस्तके, ई-पुस्तके आणि इतर माहिती स्त्रोतचा संखेत भर घालणे व नव-नविन साहित्य सभासदांना उपलब्ध करुन देण्यास आम्हाला मदत होते.
- शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन: कार्यशाळा, साक्षरता उपक्रम आणि सामुदायिक कार्यक्रमांना आपण दिलेला निधी सहाय्यक ठरतो.
- सुविधा आणि तंत्रज्ञान अपग्रेड : सर्व वापरकर्त्यांसाठी नवीनतम तंत्रज्ञानासह आरामदायक, आधुनिक जागा प्रदान करणे.
सुसंस्कृत समाज :
तुमचे योगदान साक्षरता, आयुष्यभराचे उपयोगी शिक्षण आणि सांस्कृतिक समृद्धीला प्रोत्साहन देते. हे समाजातील व्यक्तींना सक्षम बनवते, बळकट करते आणि अधिक सुसंस्कृत समाजाला घडवण्यास हातभार लावते.
कर लाभ
संस्थेला दिलेले योगदान आयकर कायद्याच्या कलम 80G अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहेत. देणगीदार कर सवलत मिळवू शकतात. तुमचा पाठिंबा केवळ समाजालाच लाभत नाही तर तुम्हाला आर्थिक लाभ देखील देतो.
उज्वल भविष्य घडवण्यासाठी आमच्या मिशनमध्ये सामील व्हा. आजच दान करा !

