अभ्यासिका

आमच्या सुविधांची माहिती मिळवा

अभ्यासिका

शांतता पुर्ण व वातानुकुलित सोईने सज्ज

शांततापुर्ण स्टडी स्पेसमध्ये वाचन कक्ष समाविष्ट आहेत. येथे वातानुकुलित सुविधा आहे. कोणतेही बोलणे किंवा संभाषण करण्याची परवानगी नाही. या जागांमध्ये नेहमी शांतता आवश्यक असते.

अभ्यासिकाचे

नियम व अटी

  • प्रवेश अर्ज रोखपालाकडे मिळेल.
  • प्रवेश घेताना दोन फोटो व आधार कार्डची छायांकित प्रत आवश्यक राहील.
  • ज्या क्षेत्रात शिक्षण घेत आहात ज्याची परिक्षा देणार आहात त्या कॉलेज/आस्थापना/विद्यापिठाच्या ओळखपत्राची  छायांकित प्रत देणे बंधनकारक आहे.
  • अभ्यासिका संस्थेच्या कार्यालयीन वेळेत खुली राहील.
  • दरवर्षी एप्रिल महिन्यात नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अभ्यासिका सभासदत्व  दोन वर्षच अभ्यासा करिता उपलब्ध राहिल.
  • अभ्यासिका सदस्यत्व रद्द करताना लेखी अर्ज करणे आवश्यक आहे.
  • कमीत कमी तीन महिन्यांची फी भरणे आवश्यक आहे.  अभ्यासिकेचे तिमाही शुल्क रू.1500/- प्रवेश शुल्क रू.25/-अनामत रू.600/-.
  • अभ्यासिका सभासद वर्गणी चालू महिन्याच्या सुरूवातीस 7 तारखेच्या आत भरणे आवश्यक आहे.
  • सदस्यत्व रद्द करावयाचे असल्यास येणा-या महिन्याच्या 7 तारखेच्या आत रद्द करणे बंधन कारक राहील.
  • अभ्यासिकेत अभ्यास करताना फोनवर बोलण्यास मनाई राहिल विद्यार्थीनी आपला फोन सायलेंट मोडवर ठेवावा व बाहेर जाऊन बोलावे.
  • अभ्यासिकेत मोबाईल, लॅपटॉप चार्जिंग करण्यास सक्त मनाई आहे.
  • लॅपटॉप ठराविक कालावधी करिता फक्त अभ्यासासाठी वापरता येईल त्या व्यतिरिक्त कोणताही वापर करण्यास मनाई आहे.
  • पुस्तके आणि इतर वस्तु आपल्या जबाबदारीवर ठेवावीत संस्था कोणत्याही स्थितीत जबाबदार राहणार नाही.
  • अभ्यासिकेत विद्यार्थ्यानी झोपू नये व इतरत्र वाचन करू नये.
  • अभ्यासिकेत स्वच्छता ठेवावी, आपण बसता त्या ठिकाणी जेवण करू नये/खाण्याचे पदार्थ टेबलावर ठेवू नये.
  • अभ्यासिकेत अशोभनिय पोषाखात येण्यास मज्जाव आहे.
  • अभ्यासिका सभासदाचे सभासदत्व रद्द करण्याचा अधिकार संस्थेस असेल.